छोट्या पडद्यावरील गायत्री दातार हे एक खास नाव आहे, खासकरुन मराठी इंडस्ट्रीत. झी मराठीवरील 'तुला पाहतेरे' या नावाने ओळखल्या जाणार्या अतिशय लोकप्रिय मराठी मालिकेत ती काम करण्यासाठी प्रसिद्ध आहे.
‘तुला पाहते रे’ ही वय विसरायला लावणारी जगावेगळी प्रेम कहाणी झी मराठी वाहिनी प्रेक्षकांसाठी घेऊन आली. अवघ्या काही दिवसांतच या मालिकेने प्रेक्षकांची मनं जिंकली. "निम्मा शिम्मा राक्षस" प्लेमध्ये ती शहजादीची मुख्य भूमिका साकारत आहे.
मूळची पुण्याची असलेल्या गायत्रीने या मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं आहे. करिअरच्या या पहिल्याच संधीचं तिनं सोनं केलं आहे असं म्हणायला हरकत नाही.
तिला फिरण्याची आणि ट्रेकिंगची खूप आवड आहे. लेह लडाखची, मनालीमध्ये ट्रेकिंग, कोयना नदीत रिव्हर राफ्टिंग असे बरेच फोटो गायत्रीने Instagram वर शेअर केले आहेत.