किसान क्रेडिट कार्ड (KCC) वापरून ३ लाखा पर्यंत ७% व्याजाने कर्ज मिळते.
जर या कर्जाची परत फेड नियमित केली तर तुम्हाला व्याजा वरती ३% सवलत मिळते .
म्हणजे ४% व्याज दराने तुम्ही ३ लाख कर्ज घेऊ शकता.
जर तुम्ही पीएम किसान(मोदी पेंशन - दोन हजार रुपये ) सन्मान निधी साठी पात्र असाल किंवा नसाल तरीही तुम्ही या कार्ड साठी अर्ज करू शकता.
या साठी तुम्ही बँक मध्ये जाऊन अर्ज जमा करू शकता किंवा ऑनलाईन अर्ज हि भरू शकता.
ऑफलाईन अर्ज कसा भरायचा ?
https://pmkisan.gov.in/Documents/Kcc.pdf या लिंक वरती क्लिक केल्या
नन्तर क्रेडिट कार्ड नोंदणी साठी लागणार अर्ज ओपन होईल.
जर हा अर्ज ओपन झाला नाही तर https://pmkisan.gov.in/ या सरकारी Website वर जाऊन अर्ज डाउनलोड करा .
या अर्जा मध्ये योग्य ती माहिती भरल्या नंतर तुम्ही हा अर्ज बँक मध्ये जमा करू शकता . .
अर्जा सोबत लागणारे कागदपत्रे
- १. सात बारा उतारा
- २. आठ - अ
- ३. दुसऱ्या बँकेतून कर्ज न घेतल्याचे शपत पत्र
- ४. रहिवाशी प्रमाणपत्र - आधार कार्ड
- ५. ओळखपत्र - इलेकशन कार्ड
- ६. दोन पासपोर्ट Size फोटो
हा अर्ज बँक मध्ये जमा केल्या नंतर २० दिवसाच्या च्या आत किसान क्रेडिट कार्ड तुमच्या पत्त्या वरती पाठवणे बँक ला बंधनकारक असते
जर तुम्ही पीएम किसान(मोदी पेंशन - दोन हजार रुपये ) योजनेचे लाभारती नसाल तरीही तुम्ही किसान क्रेडिट कार्ड साठी Apply करू शकता. त्यासाठी Indian Banks Association (IBA) एक अर्ज दिला आहे. तो अर्ज डाउनलोड करून सर्व माहिती भरून बँक मध्ये जमा करा . हा अर्ज जमा केल्या नंतर दोन आठवड्या च्या आत मध्ये शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड देणे हे बँक साठी बंधनकारक आहे .
किसान क्रेडिट कार्ड (KCC) - ऑनलाईन फॉर्म
किसान क्रेडिट कार्ड (KCC) साठी तुम्ही ऑनलाईन हि फॉर्म भरू शकता. या साठी तुम्ही तुमच्या जवळच्या "आपले सरकार" सेवा केंद्रा वर जाऊन माहिती घेऊ शकता
किसान क्रेडिट कार्ड (KCC) - कर्ज किती आणि त्याचा उपयोग
किसान क्रेडिट कार्ड (KCC)वर मिळणारे कर्ज हे खालील बाबी वरती अवलंबून असते
- १. एकूण जमीन
- २. तुमचे वार्षिक उत्पन्न
- ३. लागवडी खालील क्षेत्र
किसान क्रेडिट कार्ड (KCC) द्वारे शेतकऱ्याला ३ लाख पर्यंतचे कर्ज दिले जाते.
या मध्ये १ लाख पर्यंतचे कर्ज बिनव्याजी दिले जाते.
१ लाख ६० हजार पर्यंत विना तारण कर्ज दिले जाते.
३ लाख रुपया पर्यंतचे कर्जा साठी तारण ठेवणे गरजेचे राहील.
या व्यतिरिक्त किसान क्रेडिट कार्ड (KCC) धारक शेतकऱ्याचा जर अपघाती मृत्यू झाला किंवा अपंगत्व आले तर त्याला ५०,००० पर्यंत विमा भेटू शकतो
अश्याच शेती विषयक बातम्या व्हाट्सअँप वरती मिळवण्या साठी
खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून आमचा व्हाट्सअँप चॅनेल Subscribe करायला विसरू नका .
WhatsApp Channel : शेतीविषयक बातम्या