Maharashtra

ऍमेझॉन , फ्लिपकार्ट या सारख्या e-Commerce Website वर वस्तू विकून कमवा हजारो रुपये.

soulMarathi Sept. 20, 2021, 1:20 p.m. · 5 min. read
Share this

Corona Lockdown मुळे हजारो लोकांच्या नोकऱ्या गेल्या. मात्र या Lockdown मुळे Business चे सूत्रे रातोरात बदलली. दुकानावर जाऊन वस्तू विकत घेणारे ग्राहक हे Lockdown मुळे e Commerce किंवा ऑनलाईन खरेदी विक्री जास्त पसंती देऊ लागले. Indian e-commerce to grow 84% in 4 years, helped by Covid-19 impact: Study

२०२१ नंतर ग्राहकांचा e-Commerce Site कडे बदलेला कल पहाता, जर आपण ऍमेझॉन , फ्लिपकार्ट , Messo या e-Commerce Site सोबत आपला व्यवसाय केला तर आपल्याला संपूर्ण भारत भरतील ग्राहक मिळू शकतात.

ऍमेझॉन , फ्लिपकार्ट , messo या e-Commerce Site वर तुमचे प्रॉडक्ट कसे विकाल ?

ऍमेझॉन , फ्लिपकार्ट , messo या e-Commerce Site वर वस्तू विकण्या साठी तुम्हला Seller म्हणून अकाउंट ओपन करावे लागते. अकाउंट ओपन झाल्या नंतर, तुम्ही ज्या वस्तू इथे विकणार आहेत त्या वस्तूचे फोटोस, किंमत व इतर माहिती त्यांच्या WebSite वर भरून झाल्या नंतर तुमची Request ऍमेझॉन, फ्लिपकार्ट ऍडमिन कडे Approval साठी जाते.

ऍडमिन चे Approval आल्या नंतर, तुमची वस्तू किंवा Product हे ऍमेझॉन, फ्लिपकार्ट च्या वेबसाईट वर ग्राहकांना खरेदी साठी उपलबध होते.

ग्राहकांपर्यंत प्रॉडक्ट कसे पोहचवाल ?

तुमचे प्रॉडक्ट ग्राहकांना खरेदी साठी उपलबध झाल्या नंतर तुम्हला ऑर्डर येणास सुरुवात होते. ऑर्डर आल्या नंतर ऍमेझॉन, फ्लिपकार्ट डिलिव्हरी Boy तुमच्या घरी येऊन प्रॉडक्ट Collect करून योग्य त्या ग्राहकाच्या पत्त्या वर पोहचवतात. या साठी लागणारी फी हि तुमच्या कडून ब्रोकर फी म्हणून घेतली जाते. हि फी २० ते ५० रुपयांपर्यंत रहाते.

एका प्रॉडक्ट माघे किती नफा मिळेल ?

ऍमेझॉन , फ्लिपकार्ट या Website प्रत्येक वस्तू माघे ५० ते १०० रुपये ब्रोकर फी कट करून, उरलेले पैसे तुमच्या खात्या मध्ये जमा करतात. समजा तुम्ही ३०० रुपया पर्यंत एखादी वस्तू ऍमेझॉन , फ्लिपकार्ट वर विकताय तर या मध्ये तुमची ब्रोकर फी हि अंदाजे ५० ते १०० पर्यंत Cut होईल व उरलेले २०० रुपये तुम्हला मिळतील. या २०० रुपया मध्ये तुमचा Pakaging व प्रॉडक्ट Base Price चा खर्च वगळून तुमचा निवळ नफा हा १०० रुपया पर्यंत जरी राहिला तरी, आपण दिवसाला १० ऑर्डर माघे १००० रुपया प्रमाणे, महिन्याला घरी बसल्या तीस हजारा पर्यंत नफा कमाऊ शकतो.

कोणते प्रॉडक्ट ऍमेझॉन, फ्लिपकार्ट वर जास्त नफा मिळवून देतात ?

साड्या , कपडे, घरगुती लागणाऱ्या वस्तू, शाळेचे साहित्य, इलेक्ट्रॉनिक वस्तू यांना e-Commerce Site वर प्रचंड मागणी असते. जर या वस्तू आपण होलसेल दरात खरेदी करून ऍमेझॉन, फ्लिपकार्ट सारख्या e-Commerce Site वर विकल्या तर आपल्याला दुप्पट नफा होऊ शकतो.

आपल्या बाजारात ४० ते ५० रुपयांना सहज मिळणाऱ्या वस्तू ऍमेझॉन, फ्लिपकार्ट वर २०० ते ३०० रुपया पर्यंत विकल्या जाऊ शकतात.

आपले प्रॉडक्ट ऍमेझॉन, फ्लिपकार्ट नक्की विकेल का ?

जर आपण चांगल्या Quality चे प्रॉडक्ट विकत असाल तर तुमच्या प्रॉडक्ट ला नक्की जास्त माघनी रहाते. तसेच तुमच्या प्रॉडक्ट ला येणारे कस्टमर Reviews, Delivary time या वरही तुमचा कस्टमर Base ठरतो.

नविन प्रॉडक्ट ऍमेझॉन, फ्लिपकार्ट सारख्या e-Commerce website वर Launch केल्या नंतर, सुरुवातीचे काही दिवस ग्राहक कमी भेटतात. मात्र चांगल्या Quality चे प्रॉडक्ट साठी हळूहळू कस्टमर Base वाढतो.

ऍमेझॉन, फ्लिपकार्ट Seller बनण्या साठी सुरुवातीला किती खर्च येईल ?

फ्लिपकार्ट, ऍमेझॉन Seller Account हे निःशुल्क ओपन होते या साठी कसलाही खर्च येत नाही. पण आपण ज्या वस्तू विकणार आहात त्या वस्तू होलसेल व्यापाऱ्या कडून विकत घेन्या साठी आपल्याला पैसे खर्च करावे लागतील.

सुरुवातीला बाजारात मिळणाऱ्या ३० ते ४० रुपया पर्यंतच्या वस्तू ऍमेझॉन वर विकणायचा प्रयत्न करावा. या साठी आपल्याला ५०० ते १००० रुपया पर्यंत खर्च येईल. जर या वस्तू आपण चांगल्या प्रकारे विकू शकलात तर तुम्ही आणखी दुसरे प्रॉडक्ट हि Launch करू शकतात.

येणारा काळ हा e-Commerce Business चा असेल. Lockdown व धावपळी चे जीवन या मुळे लोक ऑनलाईन वस्तू विकत घेण्याला जास्त महत्व देतात. बदलणाऱ्या काळा सोबत, आपण आपला व्यवसाय करण्याची पद्धत हि बदलली पाहिजे.

आपल्याला अजूनही e-Commerce Business बद्दल काही प्रश्न असतील तर तुम्ही आमच्या सोबत contact करू शकता निशुल्क मार्गदर्शन केले जाईल

Whatsapp Chat : Click here Call : 9403650087 mail ID : info@soulmarathi.com

Enter Your Name
Get the latest news right in your WhatsApp. We never spam!
Read next

बहिर्जी नाईक

abc March 18, 2021, 8:06 p.m. · 5 min read