अतुल फलके यांना मुळातच लहानपणापासून सामाजिक कार्याची आवड आणि विविध उपक्रमांच्या माध्यमातून जनतेसाठी वाहून घेणारे व्यक्तिमत्व एकता फाऊंडेशनचे अध्यक्ष अतुल फलके यांच्या वाढदिवसानिमित्त हा लेखनप्रपंच.
मुळातच सुरवातीपासूनच सामाजिक, शैक्षणिक, राजकीय क्षेत्राची प्रचंड आवड असणारे व्यक्तिमत्व अतुल फलके, निमगाव वाघा गावामध्ये विविध उपक्रम राबवत गावाच्या विकासासाठी मोठे योगदान दिले आहे. आजही एकता फाउंडेशनच्या माध्यमातून ते काम करत आहे. भविष्यात गावासह तालुक्यात एकता फाउंडेशनच्या माध्यमातून मोठे काम उभे करण्याचा मानस असल्याचे त्यांनी बोलताना सांगितले.
एकता फाउंडेशनच्या माध्यमातून कोरोना प्रतिबंधासाठी जनजागृती, मास्क व सेनिटायझर वाटप, कोरोना लसीकरण केंद्र व कोटा वाढविण्यासाठी निवेदने पत्रव्यवहार, व्हर्च्यूअल जयंती, नवम तदार नोंदणी, निवडणुकीतील सर्वच उमेदवार एका छताखाली, फौंडेशनच्या बतीने यशस्वी युवक युवतींचा सन्मान असे उपक्रम राबविण्यात आले.
निमगाव वाघात सामाजिक उपक्रमाने शिवजयंती साजरी
एकता फाऊंडेशन ट्रस्ट संचलित एकता सामाजिक युवा प्रतिष्ठान व निमगाव वाघा ग्रामस्थांच्यावतीने शिवजयंती उत्साहात सामाजिक उपक्रमाने साजरी करण्यात आली. गावात स्वच्छता अभियान राबवून निरोगी आरोग्यासाठी स्वच्छ भारतासाठी संदेश देण्यात आला.
मतदार नाव नोंदणी अभियानाचे आयोजन निमगाव वाघा (ता. नगर) येथे एकता फाऊंडेशन ट्रस्ट व ग्रामपंचायतच्या संयुक्त विद्यमाने गावात नवीन मतदारांची नांव नोंदणी करण्यासाठी मतदान नाव नोंदणी अभियान राबविण्यात आले आहे. एकता फाउंडेशन ट्रस्ट च्या वतीने ट्रस्टचे अध्यक्ष अतुल फलके लोकशाही बळकट व सदृढ होण्यासाठी निवडणूक प्रक्रियेत सहभाग घेऊन प्रौढ युवक युवतींना मतदानाचा हक बजावणे आवश्यक आहे. या हेतूने गावातील १८ वर्षापुढील युवक-युवतींचे मतदार यादीत नांव समाविष्ट होण्यासाठी मतदान नाव नोंदणी अभियान राबविण्यात आले. या अभियानात नव मतदारांना नांव नोंदणीसह ग्रामस्थांना मतदान यादीतून नाव कमी करणे, एकाच मतदार संघात नाव स्थलांतरीत करणे, नाव, वय व पत्ता दुरुस्तीसाठी अर्ज भरून घेण्यात आले.
युवक-युवतींचा विशेष सन्मान
एकता फाऊंडेशन ट्रस्टच्यावतीने निमगाव (ता. नगर) येथील स्पर्धा परीक्षेत प्राविण्य मिळवून अधिकारी व डॉक्टर झालेल्या गावातील युवक-युवतींचा विशेष सन्मान एकता फाउंडेशन च्या वतीने करण्यात आला. गावातील श्रध्दा गणेश जाधव राज्य कर निरीक्षक अधिकारी, राणी बाबासाहेब डोंगरे जल संधारण अधिकारी, नितीन बारुडे पुरातत्व विभागात उप आवेक्षकपदी तसेच स्नेहल दत्तात्रय जाधव डॉक्टर झाल्याबद्दल यांचा फाऊंडेशनच्या बतीने विशेष गौरव करण्यात आला.
गावातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन व मार्गदर्शन मिळण्यासाठी शिवजयंती दिनी या गौरव समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. अतुल फलके यांच्या मते, शिक्षण हेच उज्वल भवितव्याचा पाया असून, ते भक्कम केल्याशिवाय नावलौकिक होणार नाही.
बँकेत बॅलन्स करण्याऐवजी मुलांमध्ये संस्काराचे बॅलन्स केल्यास भविष्यकाळ उज्वल आहे. गावातील मुला-मुलींनी स्पर्धापरीक्षेत कर्तृत्व सिध्द करुन गावाचे उज्वल केले. हे गावाच्या दृष्टीने भूषणावहबाब आहे. तर यश मिळवणारे हे विद्यार्थी गावातील युवक-युवतींसाठी मार्गदर्शक असणार त्यांची भावना आहे.
स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होऊन अधिकारी झालेल्यांनी गावातील विद्यार्थ्यांना जिद्द, परिश्रम व अभ्यासाचे सातत्याशिवाय पर्याय नसल्याचे सांगून योग्य पध्दतीने अभ्यास करण्याचा सल्ला ते देतात.
निमगाव वाघात निवडणुकीतील सर्वच उमेदवार आले एका छताखाली
निवडणुका लोकशाही व निकोप पद्धतीने पार पाडण्यासाठी एकता फाऊंडेशनचा आगळा-वेगळा उपक्रम नगर तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुका रंगतदार वळणावर आल्या असताना, विरोधकांवर आरोप-प्रत्यारोपाची फैरी झाडल्या जात असताना गावाच्या निवडणुकीत कोणाचा पॅनल किंगमेकर ठरणार यासाठी एकमेकांवर टीकास्त्र सोडण्याची एकही संधी सोडली जात नाही. या निवडणुकीच्या रणशिंगात गावा-गावातील राजकीय वातावरण चांगलेच तापलेले असताना निमगाव वाचा (ता. नगर) येथे निवडणुकीतील सर्वच उमेदवार एका छताखाली येण्याचा मुखद धक्का ग्रामस्थांना मिळाला.
निवडणुका लोकशाही व निकोप पद्धतीने पार पाडाव्या म्हणून एकता फाऊंडेशन ट्रस्टने सर्वच उमेदवारांना एका छताखाली एका व्यासपिठावर ग्रामस्थांसमोर आनण्याचे कार्य केले. राजकीय हेवेदावे व स्पर्धा बाजूला सारत नवनाथाच्या मंदिर सभागृहात सर्व उमेदवार एकत्र जमले होते. सर्व उमेदवारांना निवडणुकीसाठी शुभेच्छा देत गावाच्या विकासासाठी कार्य करण्याचे यावेळी आवाहन करण्यात आले.
एकता फाऊंडेशनचे अध्यक्ष अतुल फलके म्हणाले की, गावाच्या निवडणुकीत गटतटाच्या राजकारणात बादाच्या ठिणग्या पडून एकमेकांबद्दल द्वेष निर्माण होत असतात. निवडणुकीचे भांडणे वर्षानुवर्षे चालतात. हे बाद विकोपाला जाऊन गावाची शांतता भंग होते. गुण्यागोविंदाने राहणार्या गावात या निवडणुकीपायी भांडणे होऊ नये, बाद विकोपाला न जाता ही लोकशाही प्रक्रिया निकोपपणे पार पाडण्यासाठी हा उपक्रम घेतला असल्याचे त्यांनी बोलताना सांगितले. युवकांनी निमगाव वाघात साजरी केली वर्चुअल डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती कार्यक्रमातून युवकांनी नियमांचे पालन करून कोरोनाशी लढण्याचा निर्धार केला. शिका, संघटित व्हा व संघर्ष करा हा डॉ. बाबासाहेबांचा संदेश कोरोनाशी लढण्यासाठी बळ देणारा असल्याचे अतुल फलके यांचे मत आहे.
निमगाव वाघा (ता. नगर) येथे एकता फाऊंडेशन ट्रस्टच्यावतीने युवकांनी वर्चुअल डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली. कोरोनाचे संक्रमण वाढत असताना फाऊंडेशनच्या कार्यालयात वर्चुअल डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या जयंती कार्यक्रमात युवकांनी नियमांचे पालन करून कोरोनाशी लढण्याचा निर्धार व्यक्त केला. फाऊंडेशनचे अध्यक्ष अतुल फलके यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. वर्चुअल पध्दतीने घेण्यात आलेल्या या कार्यक्रमात युवकांनी कोरोनाशी लढण्यासाठी व गाव सुरक्षित ठेवण्याकरिता विविध मते मांडली. अतुल फलके म्हणाले की, बाबासाहेब आंबेडकर यांनी शिका, संघटित व्हा व संघर्ष करा, हा संदेश आज या कोरोनाशी लढण्यासाठी बळ देणारा आहे. मागील वर्षी आलेल्या कोरोना संक्रमणाने मनुष्याने हा आजार टाळण्यासाठी त्याचे उपाययोजना शिकण्याची गरज आहे. तर संघटितपणे ही महामारी थोपविण्यासाठी संघर्ष करावा लागणार आहे. बाबासाहेबांनी दिलेला विचार आजही या कोरोना महामारीत प्रेरणा देणार असल्याचे सांगितले.
एकता फाउंडेशन ट्रस्टच्यावतीने निमगाव वाघात ग्रामस्थांना मास्क व सॅनीटायझरचे वाटप
निमगाव वाघा (ता. नगर) येथील एकता फाउंडेशन ट्रस्टच्या वतीने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेश विसर्जनाची मिरवणुक न काढता जलकुंडात गणपतीचे विसर्जन करण्यात आले. तर कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता ग्रामस्थांना फाऊंडेशनचे अध्यक्ष अतुल फलके यांच्या हस्ते मास्क व सॅनीटायझरचे वाटप करण्यात आले. जिल्ह्यात रुग्ण आढळत असताना हे प्रादुर्भाव थांबविण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून हा उपक्रम राबविण्यात आल्याचे अतुल फलके म्हणाले. ग्राम स्थांनी देखील या उपक्रमाचे कौतुक केले. निमगाव वाघात लसीचा कोटा व केंद्र बाढवून देण्यासाठी निवेदन व पत्रव्यवहार निमगाव वाघा (ता. नगर) येथे आनखी एक कोरोना लसीकरण केंद्र व लसीचा कोटा वाढवून देण्याची मागणी एकता फाऊंडेशनच्या वतीने करण्यात आली. या मागणीचे निवेदन जिल्हा आरोग्य अधिकारी व नगर तालुका आरोग्य अधिकारी यांना फाऊंडेशनचे अध्यक्ष अतुल फलके यांनी दिले.